Health Tips Avoid These Mistakes While Drinking Copper Water Marathi News

Health Tips : अनेकदा तुम्ही लोकांकडून हे ऐकले असेल की, तांब्याच्या भांड्यात पाणी (Copper Water) पिण्याचे अनेक फायदे आहेत. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. यात खरंतर शंका नाहीच. पण अनेकदा तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताना आपल्याकडून नकळतपणे चुका होतात. ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या ठिकाणी आम्ही तुम्हाला तांब्याचे पाणी पिताना कोणत्या चुका करू नये हे सांगणार आहोत.    

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताना ‘या’ चुका करू नका

1. उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नका : अनेकांना सर्व ऋतून तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे आवडते. मात्र, उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी कधीही पिऊ नये. तांब्याच्या पाण्यात अँटिसेप्टिक गुणधर्म आढळतात. त्याचप्रमाणे या भांड्यात जास्त उष्णता निर्माण होते. म्हणून उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे टाळावे.

  

2. लगेच पाणी पिऊ नये : अनेकजण तांब्याच्या भांड्यात पाणी घालून लगेच ते पाणी पितात. मात्र, असे करू नये. त्यासाठी किमान 6 ते 7 तास तांब्याचे पाणी साठवून ठेवावे. आणि नंतर ते पाणी प्यावे.    

3. अति प्रमाणात सेवन करू नये : काही लोक तांब्याचे पाणी जास्त प्रमाणात सेवन करतात. मात्र, असे केल्याने आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तुम्ही तांब्याचे पाणी मर्यादित प्रमाणात प्यावे. आणि किमान 5 ग्लासाहून अधिक सेवन करू नये.  

तांब्याच्या भांंड्यातून पाणी पिण्याचे फायदे (Benefits Of Copper Water) : 

  • तांब्याच्या भांड्यातील पाणी पोटाच्या विकारांवर उपयुक्त ठरते.
  • तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे रक्त वाढते. 
  • तांब्याच्या भांड्यातील पाणी थायरॉईडच्या त्रासात उपयुक्त ठरते. 
  • कॅन्सरचा धोका कमी होतो. 
  • संधीवातात उपयोगी ठरते. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 

महत्वाच्या बातम्या : 


Source link

Check Also

Benefits Of Walnuts Good For Heart And Diabetes Marathi News

Benefits Of Walnuts : अनेकदा बाहेरच्या खाण्यापिण्यामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार होतात. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढणे, …

Benefits Of Raisins : भिजवलेल्या मनुक्याचे अनेक गुणकारी फायदे

Benefits Of Raisins : भिजवलेल्या मनुक्याचे अनेक गुणकारी फायदे Source link

Hair Care Tips How To Increase Hair Volume Naturally Marathi News

Hair Care Tips : स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकालाच आपले केस (Hair) प्रिय असतात. केस …

Leave a Reply

Your email address will not be published.