Happy Birthday Mammootty Know Car Collection Net Worth

Mammootty Birthday : मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार मामूटी  (Mammootty) यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. मामूटी यांचा जन्म 7 सप्टेंबर 1951 रोजी केरळमधील चंपू गावात झाला. त्यांचे वडील तांदळाचा व्यवसाय करायचे आणि आई गृहिणी होती.  मामूटी यांना सहा भावंडं होती. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कायद्याचे सरकारी महाविद्यालयातून एलएलबी केले.  पण त्यानंतर अभिनयक्षेत्रात काम करण्याची आवड त्यांच्यामध्ये निर्माण झाली. 

ज्युनिअर आर्टिस्टची भूमिका साकारुन केली करिअरला सुरुवात

1971 मध्ये  मामूटी यांनी  ‘अनुभवांगल पलीचकल’ या चित्रपटात काम करुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.  या चित्रपटात त्यांनी ज्युनिअर आर्टिस्टची भूमिका साकारली होती. या काळात मामूटी रंगभूमीशी जोडले गेले. त्यानंतर  1979  मध्ये देवलोकम या चित्रपटात त्यांना मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या विकांदु स्वप्नांगल या चित्रपटात काम केले. 1981 मध्ये रिलीज झालेल्या मुन्नेट्टम या चित्रपटामुळे मामूटी यांना विशेष लोकप्रियता मिळाली. मामूट्टी यांनी तामिळ, तेलगू, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड अशा 6 भाषांमधील जवळपास 400 चित्रपटांमध्ये काम केले आहे. मामूटी यांना त्यांच्या अभिनयासाठी 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.  ‘थीरम तेंदुन्ना थीरा’ (1983), ‘रुग्मा’ (1983), ‘कोट्टायम कुंजाचान’ (1990), ‘कनलकट्टू’ (1991), ‘सागरम साक्षी’ (1994), ‘राजमनिक्यम’ (2005), ‘मिशन 90 डेज’ (2007), ‘द ट्रेन’ (2011), ‘फेस 2 फेस’ (2012) हे त्यांचे चित्रपट हिट ठरले. 

मामूटी यांची संपत्ती

मामूटी 210 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्याकडे लग्झरी कारचं कलेक्शन आहे.  369 गाड्या मामूटी यांच्याकडे आहेत. यापैकी काही गाड्यांचा नंबर हा 369 आहे. त्यांच्या बंगल्याची किंमत जवळपास चार कोटी आहे.  मामूटी यांनी त्यांच्या कारसाठी  स्वत:चे वेगळे गॅरेज बांधले आहे. 1979 मध्ये मामूटी यांनी सुलफत यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.2000 मध्ये, मामूटी जवळपास दोन वर्षे प्रसारित झालेल्या ‘ज्वाला’ या मालिकेची निर्माती मामूटी यांनी केली.  त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचं नाव मेगाबाइट्स असं आहे. मामूटी यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Ranbir Kapoor Alia Bhatt Visit Ujjain : महाकालच्या दर्शनाला आडकाठी, आलिया-रणबीरविरोधात हिंदुत्ववादी संघटनेची निदर्शनं

Ponniyin Selvan Trailer Release : सिंहासनासाठी लढाई; मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर रिलीज

 


Source link

Check Also

Gandhi Jayanti 2022 The Only Hindi Film Mohandas Karamchand Gandhi AKA Mahatma Gandhi Watched Was Ram Rajya

Gandhi Jayanti 2022 : आज 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती …

Gandhi Jayanti Mahatma Gandhi Birth Anniversary Bollywood Actors Who Played The Gandhi In Films

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती. त्यानिमित्ताने देशभर गांधीजींचं स्मरण केलं जातंय. …

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी'

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी' Source link

Leave a Reply

Your email address will not be published.