Google Doodle Celebrates 96th Birth Anniversary Of Bhupen Hazarika

Bhupen Hazarika : आज संगीतकार, गीतकार आणि लेखक भूपेन हजारिका (Bhupen Hazarika) यांची 96 वी जयंती आहे. याच दिवसाचं निमित्त साधून सर्च इंजिन गुगलने एक खास डूडल (Google Doodle) बनवले आहे. या खास डूडलद्वारे त्यांनी भूपेन हजारिका यांना मानवंदना दिली आहे. भूपेन हजारिका यांचा जन्म 08 सप्टेंबर 1926 रोजी आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील सादिया येथे झाला. त्यांच्या आई-वडिलांचे नाव नीलकांत आणि शांतीप्रिया होते. भूपेन यांना बालपणापासूनच संगीताची आवड होती. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल…

वयाच्या दहाव्या वर्षी रेकॉर्ड केलं पहिलं गाणं
बालपणी भूपेन हजारिका यांना संगीताची आवड निर्माण झाली.  भूपेन हजारिका यांच्या संगीताने प्रख्यात आसामी गीतकार ज्योतिप्रसाद अग्रवाला आणि चित्रपट निर्माते बिष्णू प्रसाद राभा यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी भूपेन हजारिका यांना त्यांचे पहिले गाणे रेकॉर्ड करण्यास मदत केली, तेव्हा भूपेन हजारिका हे 10 वर्षांचा होते. केवळ 12 वर्षे वय असताना भूपेन हजारिका हे इंद्रमालती: काक्सोते कोलोसी लोई आणि बिस्वो बिजॉय नौजवान या दोन चित्रपटांसाठी गाणी लिहित आणि रेकॉर्ड करत होते.

पुरस्कारांनी गौरव 
भूपेन हजारिका यांचा अनेक पुरस्कारानं गौरव करण्यात आला. 1975 मध्ये उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच 1987 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1977 मध्ये पद्मश्री, 1992 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 2001 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं. 2012 मध्ये त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण आणि 2019 मध्ये भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले. भूपेन हजारिका यांनी 05 नोव्हेंबर 2011 रोजी मुंबईत वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

गुगलचं खास डूडल

भूपेन हजारिका यांच्या जयंतीनिमित्त गुगलनं खास डूडल बनवलं आहे. या डूडलमध्ये भूपेन हजारिका हे पेटी वाजवताना दिसत आहेत. तसेच त्यांच्यासमोर एक माईक देखील आहे. मुंबईतील रुतुजा माळीनं या गुगल डूडलचं illustration तयार केलं आहे. गुगलच्या या डूडलद्वारे भूपेन हजारिका यांना मानवंदना देण्यात आली आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Source link

Check Also

Big Shock To Those Who Use Google Translate, Google Has Stopped The Service

Google Translation: जगभरात मोठ्या प्रमाणात भाषांतर करण्यासाठी गुगल ट्रान्सलेटचा वापर केला जातो. दुसऱ्या एखाद्या भाषेतील …

Reliance Jio To Launch 4G Enabled Laptop JioBook At Rs 15000

Reliance Jio Laptop :  उद्योगपती मुकेश अंबानी यांचे रिलायन्स जिओ  (Reliance Jio )  लवकरच 4G …

Twitter War On Arrow : आशिष शेलार आणि सुशमा अंधारे यांच्यात ट्विटर वॉर

<p>अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरुन भाजपचे आशिष शेलार आणि शिवसेनेच्या सुष्मा अंधारेंमध्ये ट्विटरवॉर रंगलंय..&nbsp;</p> Source link

Leave a Reply

Your email address will not be published.