Galaxy A34 And A54 Launched In India Know Features And Price Tech News In Marathi

Samsung Galaxy A34 आणि Samsung Galaxy A54 5G स्मार्टफोन काही काळापूर्वी जागतिक बाजारात लॉन्च करण्यात आला होता. आता हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत. दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Samsung Galaxy A54 5G फोन Exynos 1380 प्रोसेसर A23 MediaTek Dimensity 1080 प्रोसेसरसह येतो. आज आपण या फोनची किंमत, उपलब्धता आणि सर्व स्पेसिफिकेशन्सची माहिती जाणून घेणार आहोत

Samsung Galaxy A34 आणि A54 5G ची किंमत

  • Samsung Galaxy A34 5G च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 30,999 रुपये आहे. याचा 256GB स्टोरेज व्हेरिएंट 8GB सह 32,999 रुपयांना उपलब्ध आहे.
  • Samsung Galaxy A54 5G च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 38,999 रुपये आहे. तर याच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 40,999 रुपयांना उपलब्ध आहे.

कुठे करू शकता खरेदी?

दोन्ही फोन Amazon.in, Flipkart, Samsung वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध असतील. सॅमसंगने 3000 रुपयांचा कॅशबॅक आणि 2500 रुपयांचा एक्सचेंज बोनसही ऑफर केला आहे. मात्र हा फायदा फोन प्री-बुकिंग करणाऱ्यांनाच मिळणार आहे. इतकंच नाही तर फोनसोबत कंपनी 5,999 रुपयांचा Galaxy Buds Live फक्त 999 रुपयांमध्ये देत आहे.

Samsung Galaxy A54 5G चे फीचर्स 

  • डिस्प्ले: 6.4-इंच FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले
  • प्रोसेसर: Exynos 1380 प्रोसेसर
  • बॅटरी आणि चार्जिंग: 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh

Samsung Galaxy A54 5G मध्ये दिलेल्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्टसह 50MP, 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 5MP मॅक्रो कॅमेरा आहे. फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे.

Samsung Galaxy A34 5G चे फीचर्स 

  • डिस्प्ले: 6.6-इंचाचा FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले
  • प्रोसेसर: मीडियाटेक डायमेन्सिटी 1080 प्रोसेसर
  • बॅटरी आणि चार्जिंग: 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh

या फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट देखील 120Hz आहे. या फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये OIS सपोर्टसह प्रायमरी कॅमेरा 48MP आहे, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 5MP मॅक्रो कॅमेरा आहे. फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा आहे.

इतर बातमी: 

Google ची ChatGPT ला टक्कर! AI लिहिणार तुमचा मेसेज; Gmail, Docs आणि इतर ॲप्समध्ये नवीन फीचर


Source link

Check Also

Pakistan Government Official Twitter Account In India Blocked After Legal Demand

Twitter Blocked Pakistan Government: एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची (Twitter News) मालकी स्विकारल्यापासूनच या-ना …

Moto G13 Launched In India Amazing Features In Low Budget Tech News In Marathi

Moto G13 Launched: Motorola ने आज भारतात नवीन बजेट 4G फोन लॉन्च केला आहे. हा …

Meta Verified Waitlist Opens In India Need To Pay Rs 1,099 To Get Blue Tick On FB Insta Know Details

Meta Verified:  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरने ब्लू टिकसाठी शुल्क आकारण्यास सुरुवात केल्यानंतर मेटानेदेखील हाच मार्ग …

Leave a Reply

Your email address will not be published.