Elon Musk Announces New Twitter Verification Plan Tentative Rollout Begin From December 2 Check Details

Twitter Verification: एलॉन मस्क (Elon Musk ) यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून अनेक बदल केले आहेत. ट्विटर अकाऊंट तीन रंगात व्हेरिफाईड होणार असल्याची माहिती एलॉन मस्क यांनी दिली आहे. यापुढे निळी, सोनेरी, राखाडी टिक व्हेरिफाईड ट्वीटर खात्याला मिळणार आहे. पुढील शुक्रवारपासून म्हणजेच 2 डिसेंबरपासून व्हेरिफाईड ट्वीटर खात्यासाठी निळ्या रंगासह सोनेरी आणि राखाडी रंगाचा मार्क येणार आहे. यामध्ये कंपन्यांसाठी सोनेरी, सरकार आणि सरकारी संस्थांसाठी राखाडी मार्क असणार आहे तर इतरांसाठी निळ्या रंगाची टिक मिळणार आहे. मस्क यांनी यासंदर्भात एक ट्विट करत माहिती दिली आहे. 

Twitter चे  मालक आणि जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk ) यांनी ट्वीटरवर एका व्यक्तीला रिप्लाय देताना व्हेरिफाईड खात्यासाठी लवकरच बदल करण्यात येणार आहे. व्हेरिफाईड खात्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या टिक असतील अशी माहिती दिली आहे. पुढील शुक्रवारपासून या सुविधेला सुरुवात होणार आहे. यामध्ये निळ्या रंगाच्या टिकशिवाय सोनेरी आणि राखाडी रंगाची टिक येणार आहे. कंपन्यांसाठी सोनेरी, सरकार आणि सरकारी संस्थांसाठी राखाडी मार्क असणार आहे तर इतरांसाठी निळ्या रंगाची टिक मिळणार आहे. 

 

बॅन अकाऊंटवरील बंदी हटवणार, एलॉन मस्क यांची घोषणा

एलॉन मस्क यांनी बॅन अकाऊंटबाबत ( Twitter Ban Accounts ) मोठा निर्णय घेतलाय. मस्क यांनी ट्विटरवरील बॅन अकाऊंटवरील बंदी (Twitter Suspended Accounts) हटवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटर पोलवरून मस्क यांनी हा निर्णय घेतला आहे. मस्क यांनी ट्विटरवर पोल घेत युजर्सला विचारलं होतं की, बॅन अकाऊंटवरील बंदी हटवावी की नाही. या पोलला 70 टक्के युजर्सने हो असं उत्तर दिलं आहे. त्यानंतर मस्क यांनी बॅन अकाऊंटवरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मस्क यांनी यासंदर्भात एक ट्विट करत माहिती दिली आहे. मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘जनतेने आपला कौल दिला आहे. पुढील आठवड्यापासून ‘माफी’ला सुरूवात होईल.’ याचा अर्थ पुढील आठवड्यापासून गंभीर चूक किंवा कायदा न मोडणाऱ्या ट्विटवर अकाऊंटवरील बंदी हटवण्यास येणार आहे. 

आठ डॉलरच्या ब्लू टिक व्हेरिफिकेशनचं री-लाँचिंग थांबवलं
 ब्लू टिक सबस्क्रिप्शन लाँच करण्याचा निर्णय तूर्तास थांबवण्यात आल्याचं मस्क यांनी ट्वीट करत सांगितलं होतं.  बनावट अकाऊंटला पूर्णपणे आळा बसवण्यासाठी योग्य मार्ग सापडेपर्यंत ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा लाँच करणं थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मस्क यांनी ट्वीट करत सांगितलं. 

ही बातमी वाचायला विसरु नका: 

धुवांधार विकेंड! शनिवारी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार तर रविवारी राज गर्जना, मुख्यमंत्री दोन दिवस गुवाहाटीत 
Source link

Check Also

Hackers Attack Icmr Website 6000 Times In Day After Aiims

ICMR Cyber Attack : एम्स (AIIMS) हॉस्पिटलच्या वेबसाईटवर सायबर हल्ला झाल्यानंतर आता भारतीय वैद्यकीय संशोधन …

Youtube Top 10 List 2022 Year Ender List Srivalli Pushpa To Kaccha Badam

Youtube Top 10 List 2022 : गुगलने (Google) 2022 या वर्षातील यूट्यूबवर (YouTube) सर्वाधिक लोकप्रिय …

Infinix Zero 5G May Launch In India Soon Know Features And Price

Infinix Zero 5G 2023 : मोबईल उत्पादक कंपनी Infinix ने आपला Zero 5G मोबाईल फोन …

Leave a Reply

Your email address will not be published.