Dwayne Johnson As Black Adam Movie Trailer Out

Black Adam Trailer : अभिनेता ड्वेन जॉनसन (Dwayne Johnson) गेल्या अनेक दिवसांपासून ‘ब्लॅक अॅडम’ (Black Adam) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता या बहुचर्चित सिनेमाचा दुसरा ट्रेलर आऊट झाला आहे. ‘ब्लॅक अॅडम’चा ट्रेलर खूपच रोमांचक आहे.

एक सामान्य माणूस ते सुपरहिरोपर्यंतचा प्रवासाची झलक प्रेक्षकांना ‘ब्लॅक अॅडम’च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये अनेक ऐतिहासिक घटना दाखवण्यात आल्या आहेत. ट्रेलरमध्ये सुपरहिरोच्या चांगल्या वाईट घटना दाखवण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. पण आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.


21 ऑक्टोबरला ‘ब्लॅक अॅडम’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्लॅक अॅडम’चे दोन्ही ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे आता प्रेक्षक सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. वार्नर ब्रदर्स डिस्कवरीचा हा आगामी सिनेमा इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. ‘ब्लॅक अॅडम’ हा सिनेमा आता 21 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

‘ब्लॅक अॅडम’ या सिनेमात ड्वेन जॉनसन मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणते या सिनेमात तो नकारात्मक भूमिकेत दिसून येणार आहे. सध्या ड्वेन जॉनसनचा ‘ब्लॅक अॅडम’ सिनेमातील लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जाउमे कोलेट सेराने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

संबंधित बातम्या

The Good Wife : ‘द गुड वाइफ’मधील काजोलचा फर्स्‍ट लुक आऊट; डिज्नी प्लस हॉटस्टारवर वेबसीरिज होणार प्रदर्शित

Brahmastra Leaked Online : ‘ब्रम्हास्त्र’ला करावा लागतोय पायरसीचा सामना; रिलीजच्या पहिल्याच दिवशी ऑनलाईन लीक
Source link

Check Also

Brahmastra Box Office Collection 425 Crore Worldwide Gross In 25 Days Number 1 Hindi Movie Of 2022

Brahmastra Box Office Collection:  बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia …

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो!

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो! Source link

Ponniyin Selvan I Box Office Collection Day 4 Movie Cross 250 Crore

Ponniyin Selvan I:  दिग्दर्शक मणिरत्न यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ …

Leave a Reply

Your email address will not be published.