Dream Girl 2 In Cinemas On 29th June, Ayushmann Khurrana Shares Official Video On Instagram

Dream Girl 2 Release Date : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सध्या चर्चेत आहे. आयुष्मानच्या ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे.  टीझर आऊट झाल्याने आयुष्मानचे चाहते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

‘ड्रीम गर्ल 2’चा टीझर आऊट

‘ड्रीम गर्ल’ हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 2019 मध्ये ‘ड्रीम गर्ल’ या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. आता आयुष्मानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच ‘ड्रीम गर्ल 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. 

तगडी स्टारकास्ट असलेला ‘ड्रीम गर्ल 2’ 

‘ड्रीम गर्ल 2’ या सिनेमात अनन्या पांडे, अन्नू कपूर, मनजोत सिंह, सीमा पहवा, असरानी, राजपाल यादव, परेश रावल आणि अभिषेक बॅनर्जी महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. त्यामुळे ‘ड्रीम गर्ल 2’ हा तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा आहे. टीझरमध्ये कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे.  


आयुष्मान खुरानाने शेअर केला ‘ड्रीम गर्ल 2’चा टीझर

आयुष्मान खुरानाने सोशल मीडियावर ‘ड्रीम गर्ल 2’ या सिनेमाचा टीझर शेअर करत या सिनेमाची घोषणा केली आहे. टीझर शेअर करत आयुष्मानने लिहिलं आहे,”तुमच्या स्वप्नसुंदरीला भेटायला तयार राहा… भेटा पूजाला 29 जूनला ईदच्या दिवशी”. 

‘ड्रीम गर्ल 2’ कधी होणार रिलीज?

‘ड्रीम गर्ल 2’ या सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ईदच्या मुहुर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 29 जून 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राज शांडिल्य या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

संबंधित बातम्या

Nilu Phule Biopic : निळू फुलेंचं आयुष्य मोठ्या पडद्यावर साकारणार! प्रसाद ओक करणार बायोपिकचं दिग्दर्शन!

Timepass 3 :  आज ओटीटीवर रिलीज होणार ‘टाइमपास 3’; झी-5 वर प्रेक्षक पाहू शकणार चित्रपट
Source link

Check Also

Turkish Melek Mosso Cut Her Hair For Iran Hijab Row Support Video Viral

Iran Hijab Protest: इराणमधील (Iran) हिजाब विरोधी चळवळ दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आता …

Netizens Trolling For  marathi Actress Prajakta Mali On Post For India From London  

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती …

PHOTO: कॅमेऱ्यात कैद झाला TMC खासदार नुसरत जहाँचा ब्रालेट लूक; पाहा फोटो!

PHOTO: कॅमेऱ्यात कैद झाला TMC खासदार नुसरत जहाँचा ब्रालेट लूक; पाहा फोटो! Source link

Leave a Reply

Your email address will not be published.