Disney Plus Hotstar Releases Teaser Of Three New Web Series Including Hansal Mehta Lootere

Lootere Teaser : सिनेनिर्माता हंसल मेहताची (Hansal Mehta) ‘लुटेरे’ (Lootere) ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या वेबसीरिजचा टीझर आऊट करण्यात आला आहे. या वेबसीरिजमध्ये अनेक विषयांवर भाष्य करण्यात आलं आहे. ‘लुटेरे’ ही वेबसीरिज हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

‘लुटेरे’ या वेबसीरिजच्या टीझरमध्ये विवेक गोंबर, दीपक तिजोरी, रजत कपूर, चंदन आणि अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत आहे. हंसल मेहताचा मुलगा जय मेहता या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून तो दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. 


हंसल मेहताने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,”जय मेहताने दिग्दर्शित केलेल्या सिनेमाची निर्मिती करत असल्याचा मला अभिमान आहे”. ‘लुटेरे’ ही वेबसीरिज अराजकतेवर भाष्य करणारी आहे. टीझरमध्ये हंसल मेहतादेखील दिसून येत आहे. ‘लुटेरे’च्या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

‘लुटेरे’चं कथानक सत्य घटनेवर आधारित आहे. या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना थ्रिल आणि नाट्य असं दोन्ही पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजचं शूटिंग यूक्रेन, केप टाऊन आणि दिल्लीत झालं आहे. सध्या हंसल मेहता ‘फराज’चं दिग्दर्शन करत आहे. या सिनेमातदेखील प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. या सिनेमात परेश रावलचा मुलगा मुख्य भूमिकेत आहे. हंसल मेहताप्रेमाने प्रेक्षकदेखील या सिनेमाची वाट पाहत आहेत. 

संबंधित बातम्या

Vikram Vedha Trailer : अॅक्शन, ड्रामा अन् थ्रील; ‘विक्रम वेधा’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज!

Thank God poster : थँक गॉडमधील अजयचा लूक रिलीज; शेअर केली खास पोस्ट
Source link

Check Also

Brahmastra Box Office Collection 425 Crore Worldwide Gross In 25 Days Number 1 Hindi Movie Of 2022

Brahmastra Box Office Collection:  बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia …

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो!

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो! Source link

Ponniyin Selvan I Box Office Collection Day 4 Movie Cross 250 Crore

Ponniyin Selvan I:  दिग्दर्शक मणिरत्न यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ …

Leave a Reply

Your email address will not be published.