Disney Plans May Cut 4000 Employees : मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कंपनी डिज्नीच्या (Disney Layoffs) जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्याची शक्यता आहे. डिज्नी कंपनी पुढील महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या तयारीत आहे. जागतिक मंदीच्या भीती डिज्नी कंपनीने ही मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. डिज्नी कंपनी एप्रिल महिन्यामध्ये 4000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा विचार करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिज्नीने कंपनीची पुनर्रचना करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी हे मोठं पाऊल उचलल्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं आहे.
Source link