Danish Kaneria Says Pakistan Jersey ForT20 World Cup 2022 Looks Like Watermelon

Pakistan Team Jersey : आगामी टी20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup) स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket Team) नवी-कोरी जर्सी सादर केली आहे. पण पाकिस्तानची ही जर्सी पाकिस्तानच्याच क्रिकेट फॅन्सना आवडलेली नाही. फॅन्सनी आतापर्यंत सोशल मीडियाद्वारे जर्सीला बरचं ट्रोल केलं असून आता पाकिस्तानचाच माजी खेळाडू दानिश कनेरियानेही (Danish Kaneria) ”ही जर्सी घालून खेळाडू मैदानात उभे नाही तर फळांच्या दुकानात उभे असल्यासारखे दिसतील.” अशी प्रतिक्रिया देत जर्सीची खिल्ली उडवली आहे.

एकिकडे सर्वच क्रिकेट फॅन्स या जर्सीबाबत विविध मजेशीर मीम्स शेअर करत आहेत. भारतातीलच नाही तर पाकिस्तानातील फॅन्सही या जर्सीची खिल्ली उडवत असताना माजी पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरिया म्हणाला आहे,”खरंच पाकिस्तान संघाची ही जर्सी कलिंगडाप्रमाणे दिसत आहे. एक व्हिडीओ गेम आहे ‘फ्रुट निंजा’. ज्यामध्ये तुम्हाला फळं कापयची असतात, यातीलच खरबूज आणि कलिंगड फळांप्रमाणेच ही जर्सी तयार केली आहे. ही पाहून खेळाडू मैदानात नाही तर फळांच्या दुकानावर आहेत, असं दिसून येत आहे.”


सोशल मीडियावरुन लॉन्च केली जर्सी

टीम इंडियाने 18 सप्टेंबरला आपली जर्सी लॉन्च केल्यानंतर लगेचच 19 सप्टेंबर रोजी पाकिस्तान संघानेही आपली जर्सी समोर आणली. पीसीएलमधील संघ इस्लामाद युनायटेडच्या ट्वीटर हँडलवरही या जर्सीचे फोटो असून जर्सी समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या जर्सीचे फोटो शेअर केले. पाकिस्तान टीमने जर्सी लॉन्च केल्यानंतर खेळाडूं नवी जर्सी घातलेले फोटोही शेअर करण्यात आले. यामध्ये कर्णधार बाबर आझम तसंच युवा गोलंदाज नसीम शाह, अष्टपैलू शादाब खान यांच्यासह महिला खेळाडूही दिसत आहेत. पाकिस्तान संघ हीच जर्सी घालून स्पर्धेत उतरणार असून पहिला सामना भारताविरुद्ध असणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना 26 ऑक्टोबररोजी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न मैदानात खेळवला जाणार आहे.  

महत्वाच्या बातम्या : 
Source link

Check Also

Indonesia Football Match Violence At Least 127 People Killed In Riot At Football Match In Indonesia East Java Arema Malang

Indonesia Football Match Violence : इंडोनेशियाच्या (Indonesia) मलंग रीजेंसीच्या कंजुरुहान स्टेडियमवर चेंगराचेंगरी झाली. यात 129 …

It’s difficult to defend when Surya attacks bowlers: Parnell

Suryakumar Yadav’s incredibly strong and powerful batting has made him one of the most feared …

Former Pakistan Cricketer Kamran Akmal Compares Arshdeep Singh With Zaheer Khan 

Arshdeep Singh in Team India : डावखुरा युवा गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) याने आयपीएल …

Leave a Reply

Your email address will not be published.