Coronavirus : सावधान! कोरोना विषाणू करतोय मेंदूवर परिणाम, 'या' गंभीर आजारांचा धोका

Corona Treatment : कोरोना विषाणूने ( Coronavirus ) मागील दोन वर्षांपासून देशासह जगभरात कहर माजवला आहे. कोरोना विषाणू त्याचे डेल्टा ( Delta ) आणि ओमायक्रॉन ( Omicron ) हे व्हेरियंट यामुळे हजारो रुग्णांना आपले प्राण गमावले. भारतातही अनेक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता पुन्हा एकदा कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. एकीकडे कोरोनाचा धोका कायम असताना, दुसरीकडे कोरोना विषाणू संदर्भात चिंताजनक माहिती समोर आली आहे. एका अभ्यासानुासर, कोरोना विषाणू मेंदूवर परिणाम करतो, यामुळे रुग्णांना मेंदू संबंधित अनेक आजारांचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे.

कोरोना विषाणू करतोय मेंदूवर परिणाम

एका संशोधनामध्ये पोस्ट कोविड इफेक्ट संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. कोरोना होऊ गेल्यानंतर रुग्णाच्या शरीरात कोणते बदल होतात आणि याचा शरीरावर काय परिणाम होतो, याचा या संशोधनात अभ्यास करण्यात आला. यामध्ये चिंताजन बाब समोर आली आहे. अभ्यासानुसार, कोरोना विषाणूमुळे रुग्णांच्या मेंदूवर परिणाम होतो. कोरोना विषाणू रुग्णाच्या मेंदूमध्ये काही छोटे बदल होतात. त्यामुळे लोक अनेक आजारांना बळी पडत आहेत. डॉक्टरांच्या मते, कोविड विषाणूला रोखण्यासाठी त्याच्या प्रोटोकॉलचे पालन करणं आवश्यक आहे.

कोरोनामुळे मेंदूमध्ये छोटे बदल

नवीन अभ्यासात असं समोर आलं आहे की, कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर दीर्घकाळात मेंदूमध्ये अनेक बदल घडवून आणू शकतो. रेडिओलॉजिकल सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिकेच्या (RSNA)संशोधकांनी पोस्ट कोविड परिणाम जाणून घेण्यासाठी विशेष MRI मशीनचा वापर केला. त्यानंतर धक्कादायक निकाल समोर आला. या प्रकारच्या इमेजिंग मशीनचा वापर मायक्रोब्लीड्स, ब्रेन ट्यूमर आणि स्ट्रोक यासारख्या अनेक न्यूरोलॉजिक परिस्थिती शोधण्यासाठी देखील केला जातो, असं संशोधकांनी सांगितलं.

नैराश्य आणि चिंतेचं प्रमाण

या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी कोरोनामधून बरे झालेल्या 46 रुग्ण आणि 30 निरोगी लोकांवर अभ्यास केला. यामध्ये लोकांच्या मेंदूचे स्कॅनिंग करण्यात आलं. यामध्ये पोस्ट कोविड रुग्णांमध्ये चिंता, निद्रानाश, नैराश्य, डोकेदुखी आणि इतर मानसिक आजार दिसून आले. कोविडमधून बरे झाल्यानंतर लोकांना अशा प्रकारच्या समस्या जाणवत होत्या.

Source link

Check Also

Benefits Of Skin Fasting Facial Glow Know About Skin Care Tips

Benefits Of Skin Fasting:  प्रत्येक तरुणीला तिची त्वचा सुंदर आणि चमकदार असावी असे वाटते. अनेक …

Health Tips Morning Workout Reduces Risk Of Heart Attack And Stroke Know Benefits Marathi News

Health Tips : आजकाल शरीराला फिट ठेवण्यासाठी वर्कआउट खूप महत्त्वाचा मानला जातो. वर्कआऊट तुम्ही दिवसभरात …

Winter Health Tips Food For Strong Immunity Marathi News

Winter Healthy Food List : हिवाळ्यात आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, हवामानातील बदलामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published.