Cleaning Tips Ginger Help In Cleaning House Marathi News

Cleaning Tips : घर असो किंवा ऑफिस, बाहरेचा परिसर असो अथवा एखादी आरती स्वच्छता ही आलीच. याच स्वच्छतेसाठी बाजारात अनेक स्वच्छतेशी संबंधित वस्तू उपलब्ध असतात. परंतु, तुम्हाला घरच्या घरी कमी पैशांत घरी असलेल्या वस्तूंपासून स्वच्छता केली. तर तुमचे घर अधिक स्वच्छ दिसेल. यामुळे तुम्हाला खर्चही करावा लागणार नाही. घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये जर तुम्ही आल्याचा स्वच्छतेसाठी वापर केला तर तुम्हाला खूप फायदा होईल. आल्याच्या गुणधर्मांबद्दल सर्वांनाच माहिती आहे, परंतु तुम्हाला हे माहित आहे का की आरोग्यासोबतच आल्याचा तुकडा घराची साफसफाई करण्यातही खूप मदत करू शकतो. जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला स्वच्छतेमध्ये आल्याचा वापर कसा करता येईल हे जाणून घ्या. 
 
वॉश बेसिन साफ ​​करण्यासाठी : 

वॉश बेसिन साफ ​​करण्यासाठी, तुम्हाला सर्वात आधी आलं नीट सुकवावे लागेल आणि त्याची पावडर तयार करावी लागेल. यानंतर एक कप पाण्यात आले पावडर आणि दोन चमचे बेकिंग सोडा मिसळा आणि त्याची पेस्ट तयार करा. आता तयार पेस्टने वॉश बेसिन पूर्णपणे स्वच्छ करा. तुमचे वॉश बेसिन पूर्णपणे चमकेल. 

आल्यापासून चिकटपणा निघून जाईल : 

कोणत्याही ठिकाणचा चिकटपणा दूर करण्यासाठी आलं हा एक उत्तम पर्याय आहे. यासाठी आधी पाण्यात आलं पावडर आणि व्हिनेगर मिसळून पाणी तयार करावा. आता हे पाणी टेबलावर, खुर्चीवर किंवा ज्या भागाला चिकट आहे त्यावर शिंपडा आणि कापडाने स्वच्छ करा. हट्टी डाग काही वेळातच निघून जातील. 

कीटकांपासून मुक्त व्हा :

स्वच्छते व्यतिरिक्त, आलं तुम्हाला कीटक दूर करण्यास देखील मदत करू शकतात. रोज घराची साफसफाई केल्यावरही कुठून तरी घरातून किडे बाहेर पडतात. अशा परिस्थितीत आल्याचा उग्र वास तुम्हाला उपयोगी पडू शकतो. यासाठी आल्याचा रस पाण्यात मिसळून स्प्रे बाटलीत ठेवावा आणि ज्या ठिकाणी कीटक येत असतील त्या ठिकाणी ही फवारणी करावी. कीटकांसोबत सरडेही पळून जातील. 

स्नानगृह स्वच्छ करण्यासाठी :

बाथरूम आणि सिंकची नळी साफ करण्यासाठीही तुम्ही आल्याचा वापर करू शकता. यासाठी आलं पावडर, व्हिनेगर आणि बेकिंग सोडा पाण्यात मिसळा. आता या मिश्रणाने बाथरूम आणि सिंक ड्रेन स्वच्छ करा. याच्या सहाय्याने वेळोवेळी नाला साफ करत रहा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 


Source link

Check Also

Benefits Of Walnuts Good For Heart And Diabetes Marathi News

Benefits Of Walnuts : अनेकदा बाहेरच्या खाण्यापिण्यामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार होतात. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढणे, …

Benefits Of Raisins : भिजवलेल्या मनुक्याचे अनेक गुणकारी फायदे

Benefits Of Raisins : भिजवलेल्या मनुक्याचे अनेक गुणकारी फायदे Source link

Hair Care Tips How To Increase Hair Volume Naturally Marathi News

Hair Care Tips : स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकालाच आपले केस (Hair) प्रिय असतात. केस …

Leave a Reply

Your email address will not be published.