Brahmastra Has To Face Piracy Leaked Online On The First Day Of Release

Brahmastra Leaked Online : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. आज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण आता या सिनेमाला पायरसीचा सामना करावा लागत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. 

‘ब्रम्हास्त्र’ हा सिनेमा एचडी क्वालिटीमध्ये लीक झाला आहे. अनेक साईटवरून हा सिनेमा नेटकरी डाऊनलोड करत आहेत. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अयान मुखर्जीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 


‘ब्रम्हास्त्र’ सिनेमात प्रेक्षकांना शाहरुख खानची झलक पाहायला मिळत आहे. ‘ब्रम्हास्त्र’ हा सिनेमा प्रेक्षक टेलिग्रामवरूनदेखील डाऊनलोड करत आहेत. आता हा सिनेमा नेटकऱ्यांना घरबसल्या पाहायला मिळत असल्याने याचा फटका निर्मात्यांना बसणार आहे. ‘ब्रम्हास्त्र’ हा बिग बजेट सिनेमा आहे, त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण आता हा सिनेमा ऑनलाईन लीक झाल्याने बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा जादू दाखवण्यात कमी पडणार आहे. 

हॅशटॅग बॉयकॉटचा ‘ब्रम्हास्त्र’वर परिणाम

गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होणाऱ्या सर्वच सिनेमांना नेटकऱ्यांनी बॉयकॉट केलं आहे. याचाच फायदा दाक्षिणात्य सिनेमांना होत आहे. कोणताही बॉलिवूड सिनेमा आला की तो कोणत्या ना कोणत्या कारणाने हॅशटॅग बॉयकॉट होत आहे. सिनेमे बॉयकॉट होत असल्याने प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्यापेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सिनेमांना पसंती दर्शवताना दिसत आहे. अशातच आता सिनेमे ऑनलाईन लीक झाल्याने प्रेक्षक घरबसल्या सिनेमा पाहायला पसंती दर्शवत आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमावर होणार आहे. 

संबंधित बातम्या

Brahmastra Review : उत्कृष्ट व्हीएफएक्स पण कंटाळवाणे सादरीकरण

Ranbir Kapoor On Shamshera : ‘…म्हणून शमशेरा झाला फ्लॉप’; रणबीरनं सांगितलं कारण
Source link

Check Also

Brahmastra Box Office Collection 425 Crore Worldwide Gross In 25 Days Number 1 Hindi Movie Of 2022

Brahmastra Box Office Collection:  बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia …

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो!

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो! Source link

Ponniyin Selvan I Box Office Collection Day 4 Movie Cross 250 Crore

Ponniyin Selvan I:  दिग्दर्शक मणिरत्न यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ …

Leave a Reply

Your email address will not be published.