Birthday Special Asha Bhosle Is Singer But She Is Fabulous Cook Know About Her Restaurants

Asha Bhosle : प्रसिद्धा गयिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीमध्ये झाला. आशा भोसले यांची गाणी गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. पण त्या मल्टी टॅलेंटेंड आहेत, असं म्हणता येईल. कारण संगीतक्षेत्रासोबतच त्या कुकिंगक्षेत्रात देखील एक्सपर्ट आहेत, हे अनेकांना माहित नसेल. आशा भोसले यांचे जगभरात अनेक रेस्टॉरंट्स आहेत. जाणून घेऊयात आशा भोसले यांच्या रेस्टॉरंट्सबद्दल…

आशा भोसले यांना कुकिंगची आवड आहे. त्यांनी बनवलेले कढई गोश्ट आणि बिर्याणी हे पदार्थ अनेक सेलिब्रिटींना आवडतात. एका मुलाखतीमध्ये आशा भोसले यांनी सांगितलं होतं की, जर त्यांनी संगीतक्षेत्रात काम केलं नसतं तर त्या कुक झाल्या असत्या. 

जगभरात आशा भोसले यांचे रेस्टॉरंट्स
जगभरात आशा भोसले यांचे वेगवेगळे हॉटेल्स आहेत. दुबई आणि कुवेतमध्ये आशा भोसले यांचे ‘आशाज’ नावाचे हॉटेल आहे. तसेच आबुधाबी, दोहा, बहरीन येथे देखील आशा भोसले यांचे रेस्टॉरंट आहेत. या हॉटेल्समध्ये मिळणारे भारतीय पदार्थ लोक आवडीनं खातात. एवढेच नाही तर आशा भोसले या स्वतः या या रेस्टॉरंट्सच्या शेफना ट्रेनिंग देतात. आंतरराष्ट्रीय कूक रसेल स्कॉट यांनी ‘आशा’ ब्रँडच्या रेस्टॉरंट्सचे राइट्स यूकेसाठी विकत घेतले आहेत. या अंतर्गत ‘आशा’ या नावाने सुमारे 40 रेस्टॉरंट सुरू करण्याची योजना करण्यात आली आहे.


आशा भोसले यांचा जन्म मंगेशकर कुटुंबातला असून त्यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा त्यांना मिळाला. लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर या भावंडांचे मार्गदर्शन आशाताईंना मिळाले. आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात माझा बाळ या चित्रपटातून केली. मराठी गाण्यांसोबतच आशाताईंनी बॉलिवूडमध्येही आपल्या स्वरांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. अनेक सदाबहार गाणी त्यांनी सिनेसृष्टीला दिली.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Asha Bhosale : ‘लग्न झाल्यानंतर बायकांचं वजन वाढतं, पिझ्झा सोडा भाकरी खा’; आशा भोसलेंनी दिल्या फिटनेस टिप्स
Source link

Check Also

Brahmastra Box Office Collection 425 Crore Worldwide Gross In 25 Days Number 1 Hindi Movie Of 2022

Brahmastra Box Office Collection:  बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia …

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो!

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो! Source link

Ponniyin Selvan I Box Office Collection Day 4 Movie Cross 250 Crore

Ponniyin Selvan I:  दिग्दर्शक मणिरत्न यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ …

Leave a Reply

Your email address will not be published.