Bigg Boss Marathi Will Be The Biggest Announcement Mahesh Manjrekar Shared The Promo

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. बिग बॉसच्या चौथ्या सीझनची (Bigg Boss Marathi 4) घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या कार्यक्रमाची प्रतीक्षा करत आहेत. आता या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला आहे. हा कार्यक्रम महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) होस्ट करत असून त्यांनीदेखील प्रोमो शेअर केला आहे. 

महेश मांजरेकरांनी प्रोमो शेअर करत लिहिलं आहे,”मी करणार आहे बिग बॉस मराठीची सगळ्यात मोठी घोषणा”. प्रोमोमध्ये महेश मांजरेकरांचे तीन धमाकेदार लुक दिसत आहेत. मांजरेकरांनी पहिल्या लुकमध्ये सदरा आणि जॅकेट घातलं आहे. तर दुसऱ्या लुकमध्ये तोडांत शिट्टी पकडली असून त्यांचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे. तर तिसऱ्या लुकमध्ये ते पोस्टमनच्या लुकमध्ये दिसत आहेत.


महेश मांजरेकर आता कोणती घोषणा करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन पुढे ढकलला गेला असल्याची बातमी गेल्या काही दिवसांत समोर आली होती. त्यामुळे आता ते कोणती घोषणा करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. महेश मांजरेकर लवकरच बिग बॉस मराठीची रिलीज डेट जाहीर करणार असंही म्हटलं जात आहे.  

महेश मांजरेकर करणार होस्ट 

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन कोण होस्ट करणार यावर वेगवेगळे अंदाज बांधले जात होते. बिग बॉस मराठीचे तिन्ही पर्व महेश मांजरेकरांनी होस्ट केले आहेत. गतवर्षी कर्करोगामुळे महेश मांजरेकरांनी काही भागांमधून ब्रेक घेतला होता. त्यामुळे चौथा सीझन कोण होस्ट करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. पण कलर्स मराठीने प्रोमो शेअर करत महेश मांजरेकर होस्ट करणार असल्याचं जाहीर केलं.  

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी सीझन 4’साठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार? ‘या’ कारणामुळे शो लांबणीवर पडल्याची चर्चा!

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनचा प्रोमो आऊट; मांजरेकरांनी सांगितले राग शांत करण्याचे 101 उपाय
Source link

Check Also

Brahmastra Box Office Collection 425 Crore Worldwide Gross In 25 Days Number 1 Hindi Movie Of 2022

Brahmastra Box Office Collection:  बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia …

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो!

Richa-Ali Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी बांधली लग्नगाठ; पाहा फोटो! Source link

Ponniyin Selvan I Box Office Collection Day 4 Movie Cross 250 Crore

Ponniyin Selvan I:  दिग्दर्शक मणिरत्न यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ …

Leave a Reply

Your email address will not be published.