Bharat Ratna Lata Dinanath Mangeshkar International College Of Music Will Start Its Certificate Courses From September 28

Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय (Bharat Ratna Lata Dinanath Mangeshkar International Music College) सुरू करण्यात येणार आहे. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयांतील
प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना 28 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. 

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयांतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पु.ल. देशपांडे अकादमीमध्ये तात्पुरत्या काळासाठी 28 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत. 

एकनाथ शिंदे यांनी 16 ऑगस्टला झालेल्या बैठकीत भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एकूण एक वर्ष कालावधीचे सहा अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. त्यामध्ये मिळून 150 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील.  

लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, भारतीय बासरी वादन, तबला वादन, सतार वादन, हार्मोनियम/कीबोर्ड वादन, ध्वनी अभियांत्रिकी अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या महाविद्यालयाचे कामकाज व्यवस्थित व उत्कृष्ट दर्जाचे होण्यासाठी हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ नेमण्यात आले असून यामध्ये उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, मयुरेश पै तसेच कला संचालक सदस्य असतील.

महाविद्यालय यावर्षी सुरू करण्यास जागे अभावी अडचण येऊ नये यासाठी पु.ल. देशपांडे कला अकादमीमध्ये तात्पुरते महाविद्यालय सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. 28 सप्टेंबर रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांची जयंती आहे. जयंतीनिमित्त यावर्षी पहिली बॅच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जागा आहे. याच जागेत भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. या कामासाठी एका खास समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने यावर्षी सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाचा अहवाल लवकर सादर करण्याच्या सूचनाही मागे पार पडलेल्या एका बैठकीत देण्यात आल्या आहेत.

6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे. 

संबंधित बातम्या

Lata Mangeshkar : आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय लता मंगेशकरांच्या जयंती दिनी सुरू होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश

MBBS Students : तीन महिन्यांपासून मानधन नाही, लता मंगेशकर रुग्णालयातील आंतरवासित डॉक्टर तीन दिवसांपासून संपावर


Source link

Check Also

Gandhi Jayanti Mahatma Gandhi Birth Anniversary Bollywood Actors Who Played The Gandhi In Films

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती. त्यानिमित्ताने देशभर गांधीजींचं स्मरण केलं जातंय. …

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी'

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी' Source link

Majha Katta Youths Need To Take Initiative To Experiment With Dramas Like Mahanirvan And Begham Barve Said Satish Alekar On Majha Katta

Satish Alekar On Majha Katta : ‘महानिर्वाण’ या लोकप्रिय नाटकाचे वेगवेगळ्या भाषेत प्रयोग होतात. पण …

Leave a Reply

Your email address will not be published.