Asia Cup 2022: Bollywood Actress Urvashi Rautela Reacts After Pakistan Pacer Naseem Shah’s Comment

Asia Cup 2022: बॉलिवूडची स्टार अभिनेत्री उर्वशी रौतेलाची (Urvashi Rautela) सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली. भारत विरुद्ध पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील सामना पाहण्यासाठी गेलेल्या उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओनंतर उर्वशी आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) यांचं नाव एकमेकांसोबत जोडलं गेलं. यावर “उर्वशी रौतेला कोण आहे? मला माहिती नाही”, अशी नसीम शाहनं प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, या प्रकरणावर आता उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलंय.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 4 सप्टेंबर रोजी आशिया चषकातील दुसरा गट सामना खेळण्यात आला होता. उर्वशी रौतेला हा सामना पाहायला गेली होती. याच सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नसीम शाह हसताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे उर्वशीदेखील स्टेडियममध्ये बसून हसत आहे. ज्यानंतर नसीम शाह आणि उर्वशी रौतेलाबाबत अनेक चर्चांना उधाण आलं. 

व्हिडिओ- 

उर्वशी रौतेलाचं त्या व्हिडिओवर स्पष्टीकरण
“माझ्या सोशल मीडिया टीमनं काही दिवसांपूर्वी काही एडिटेड व्हिडिओ शेअर केले, जे माझ्या चाहत्यांनी तयार केले होतं. या व्हिडिओमध्ये अन्य काही लोकांचा समावेश होता, याची माझ्या टीमला कल्पना नव्हती. यामुळं कोणत्याही प्रकारचा गैरसमज पसरवू नये”, असं उर्वशी रौतेलानं आवाहन केलंय. 

व्हायरल व्हिडिओनंतर नसीम शाह काय म्हणाला?
उर्वशी रौतेलाबद्दल नसीम शाहला प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना तो म्हणाला की, “उर्वशी रौतेला कोण आहे, हे मला माहिती नाही. ती कोणते व्हिडीओ शेअर करते? याबाबत मला काहीही माहिती. सध्या माझे लक्ष फक्त क्रिकेटवर आहे. मला चांगले क्रिकेट खेळायचे आहे. मी मैदानावर क्रिकेट खेळत असतो. मला याबाबत कशाहीची कल्पना नाही. जे लोक स्टेडियममध्ये येऊन सामना पाहतात, त्यांचे आभार मानायला हवेत. कोणाला मी आवडत असेन तर ती चांगली गोष्ट आहे.” अशी नसीम शाहनं सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर दिली होती.

हे देखील वाचा- 


Source link

Check Also

IND Vs SA 3rd T20 Match Highlights South Africa Won By 49 Runs Against India Holkar Stadium Dinesh Karthik 46 Runs Off 21

IND vs SA 3rd T20 Match Highlights: रिले रोसो (Rilee Rossouw)- क्विंटन डी कॉकच्या (Quinton …

3rd T20I: SA win inconsequential match; India unflustered in loss

The third umpire wanted confirmation when Tristan Stubbs’s low grab off Suryakumar Yadav – plucked …

IND Vs SA 3rd T20 Match Highlights South Africa Won By 49 Runs Against India Holkar Stadium Dinesh Karthik 46 Runs Off 21

IND vs SA 3rd T20:  रिले रोसो (Rilee Rossouw)- क्विंटन डी कॉकच्या (Quinton de Kock) …

Leave a Reply

Your email address will not be published.