Armaan Kohli Get Bail After A Period Of One Year

Armaan Kohli : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अरमान कोहलीला (Armaan Kohli) अखेर हायकोर्टानं दिलासा दिला आहे. वर्षभराच्या कालावधीनंतर अरमान कोहलीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. एनसीबीनं दाखल केलेल्या एनडीपीएसच्या खटल्यात 1 लाखांच्या जामीनावर सुटका करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. 

ड्रग्स प्रकरणात अरमानला केली होती अटक

ऑगस्ट 2021 मध्ये, अरमान कोहलीच्या घरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा टाकला होता. त्यावेळी एनससीबीला अरमानच्या घरी मादक पदार्थ सापडले. त्यानंतर पोलिसांनी अरमान कोहलीला अटक केली. ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अरमान कोहली अटक करण्याच्या आधी  एनसीबीने एका ड्रग पेडलरला ताब्यात घेतले होते. ड्रग्जच्या पेडलरची चौकशी केल्यानंतर एनसीबीने अभिनेता अरमान कोहलीच्या घरी छापा टाकून त्याला अटक केली होती. आता आरमानला जामीन मंजूर झाला आहे.  अरमाननं कोर्टाला जामीन अर्ज केला होता. पण डिसेंबर 2021 मध्ये  अरमानचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. 

अरमान कोहली याआधीही देखील वादात सापडला होता. मारहाण केल्याचा आरोप नीरु रंधावाने अरमानव केला होता. अरमान नीरुसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. अरमानचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले होते. 

हिट चित्रपटांमध्ये अरमाननं केलं काम

अरमान कोहली बिग बॉस सीझन 7 चा स्पर्धक होता. या सीझनमध्ये अरमान आणि काजोलची बहीण तनिषाच्या अफेअरची मोठी चर्चा रंगली होती. अरमानने 1992 मध्ये ‘विरोधी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर दुश्मन जमाना, अनाम, कोयल, कोहरा, औलाद के दुश्मन, जुआरी, वीर, कहर, दुश्मनी या सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र म्हणावं तेवढं यश आणि प्रसिद्धी अरमानला मिळालं नाही. बिग बॉसच्या घरात असताना अभिनेत्री काजोलची बहीण तनिषासोबत अरमानची जवळीक वाढली होती. मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 
Source link

Check Also

Gandhi Jayanti 2022 The Only Hindi Film Mohandas Karamchand Gandhi AKA Mahatma Gandhi Watched Was Ram Rajya

Gandhi Jayanti 2022 : आज 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती …

Gandhi Jayanti Mahatma Gandhi Birth Anniversary Bollywood Actors Who Played The Gandhi In Films

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती. त्यानिमित्ताने देशभर गांधीजींचं स्मरण केलं जातंय. …

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी'

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी' Source link

Leave a Reply

Your email address will not be published.