Android Mobiles Settings Are Turn Off Now Otherwise Data May Be Hack Tech News Marathi

Smartphone Tips : तुमच्या हातात जो अॅण्डॉईड स्मार्टफोन (Android Smartphone) आहे त्यामध्ये अशा काही सेटिंग्स आहेत त्या ऑन करून ठेवल्यामुळे बॅटरी लवकर उतरते. अशा वेळी तुमच्या मोबाईलमधील डेटा चोरीला जाऊ शकतो. त्यामुळे तुमचा डेटा हॅक होऊ नये म्हणून  ‘या’ सेटिंग्स ऑन असतील,तर तात्काळ बंद करा. आओएस (IOS) च्या तुलनेत अॅण्डॉईड मोबाईलला हॅक करणे जास्त सोपं असते. याचं कारण अॅण्डॉईड मोबाईल हे ओपन नेटवर्क असल्यामुळे कोणत्याही सायबर गुन्हेगाराकडून मोबाईलमध्ये घुसखोरी केली जाऊ शकते. 

 

या सेटिंग्स करा बंद 

 

1. आवश्यकता असेल तरच लोकेशन्सचा अॅक्सेस द्या

तुम्ही मोबाईल वापरत असताना अनेक वेबसाईट्सला भेट देता. तसेच अॅण्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी आणि लोकेशन अॅक्सेस देण्यासाठी बऱ्याच सेटिंग्सला परवानगी देता. परंतु, या सर्व अॅक्सेस तेव्हाच द्या जेव्हा त्याची खरच गरज असेल. तुमच्या मोबाईलमधील सर्व अॅप्सला लोकेशन अॅक्सेस दिल्यामुळे तुमची लोकेशन हिस्ट्री सर्वांना दिसून येईल. यामुळे तुमची लोकेशन हिस्ट्री कुणीही माहिती करून घेऊ शकते. या सेटिंग्स ऑन असल्यामुळे मोबाईलची बॅटरीही जास्त खर्च होते. 
 

WiFi आणि Bluetooth  ऑप्शन 

तुम्ही अॅण्डॉईड युजर असला तर  तुमच्या मोबाईलमध्ये  WiFi आणि Bluetooth हे दोन्ही ऑप्शन्सच्या सेटिंग्स बऱ्याचदा ऑन असणार. त्यामुळे सर्वात आधी या सेटिंग्स बंद करा. हे दोन्ही ऑप्शन्स ऑन करून ठेवल्यामुळे तुमचा मोबाईल इतर कोणत्याही डिव्हाईसला कनेक्ट होऊ शकते. यामुळे तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो. यासोबत तुमच्या मोबाईलची बॅटरीही लवकर उतरते.  त्यामुळे  WiFi आणि Bluetooth  आवश्यकता असेल तरच ऑन करा. अन्यथा बंद करा. 

नोटिफिकेशन हाइड करा

आपण आपल्या मोबाईलवरून आपण बरीच कामे पूर्ण करतो. त्यामुळे मोबाईलमध्ये आपली महत्त्वाची माहिती सेव्ह असते. तसेच जगभरातील सर्व माहिती सर्च करण्यासाठी मोबाईलचाच जास्त वापर करतो. नवीन मेसेज,ओटीपी आणि पासवर्डही मोबाईलवरच मिळवला जातो. जर तुमच्या मोबाईमधील नोटीफिकेशनचा ऑप्शन ऑन असेल तर तुमची माहिती हॅक होऊ शकते. त्यामुळे हे ऑप्शन Hide  करून ठेवा. 
 

मोबाईल Location हिस्ट्रीला बंद करा

तुमच्या मोबाईलची लोकेशन हिस्ट्रीचा ऑप्शन ऑन ठेवल्यामुळे तुमच्यावर गुगलची पाळत वाढते. यामुळे कंपनीकडून  मोबाईलवर विविध प्रकारच्या  जाहिराती, हॉटेल्स,क्लब आणि शॉपिंग मॉल यांची माहिती दिली जाते. ही सर्व माहिती तुमच्या लोकेशनुसार मोबाईल फ्लॅश होत असते. त्यामुळे नेहमी लोकेशन हिस्ट्री बंद करून ठेवा. यासाठी तुमच्या मोबाईलमधील सेटिंग्समध्ये जाऊन गुगल अकाउंटचा ऑप्शन निवडा आणि यानंतर मॅनेज अकाउंटमध्ये जाऊन ‘डेटा अॅण्ड प्रायव्हसी’ च्या सेक्शनमध्ये जा आणि लोकेशन हिस्ट्री ऑन असेल, तर तात्काळ बंद करा. 


Source link

Check Also

New Malware DogeRAT Remote Access Trojan Spreading Through Fake Android Apps Know How To Be Safe Detail Marathi News

DogeRAT Malware:  DogerAT (रिमोट ऍक्सेस ट्रोजन) या नव्या व्हायरसचा शोध संशोधकांनी लावला असून बनावट अॅप्सच्या …

Samsung Galaxy F54 5G India Launch Date Confirmed Officially Expect Price Features Samsung Galaxy F54 5G Pre Booking

Samsung Galaxy F54 5G मध्ये कंपनी Galaxy M54 5G स्मार्टफोन प्रमाणेच स्पेसिफिकेशन आणि फिचर्स देऊ …

Iphone 15 And 15 Pro Will Soon Launch In India Iphone 15 Price Launch Date Charging Feature Detail Marathi News

iPhone 15 series: आताच्या तरुण पिढीमध्ये आयफोनचे (Iphone) युजर्स अधिक आहेत जे आयफोनच्या नव्या सीरिजची …

Leave a Reply

Your email address will not be published.