Amitabh Bachchan Goodbye’ Trailer Released Rashmika Mandanna Will Debut In Bollywood

Goodbye Trailer Release : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या त्यांच्या आगामी ‘गुडबाय’ (Goodbye) सिनेमामुळे चर्चेत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून ट्रेलरला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. ‘गुडबाय’ या सिनेमाच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 

‘गुडबाय’ सिनेमाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमा कौटुंबिक नात्यावर बेतलेला आहे. विनोद, नाट्य अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. विनोदवीर सुनील ग्रोवर हेदेखील ‘गुडबाय’ या सिनेमाचा भाग आहेत. 

‘गुडबाय’ 7 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्नाची मुख्य भूमिका असलेला ‘गुडबाय’ हा सिनेमा येत्या 7 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. ‘गुडबाय’ या सिनेमात अमिताभ बच्चन, नीना गुप्ता आणि रश्मिका मंदान्ना महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

अमिताभ बच्चन यांचे आगामी सिनेमे

‘गुडबाय’ सिनेमाचं शूटिंग गेल्या वर्षी सुरू झालं होतं. काही महिन्यांपूर्वी अमिताभ बच्चन यांचे सेटवरील पाळीव प्राण्यांसोबत खेळतानाचे फोटो व्हायरल झाले होते. या सिनेमात अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदन्ना यांच्याशिवाय नीना गुप्ता, एली अविराम, सुनील ग्रोवर, साहिल मेहता आणि पावेल गुलाटी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘गुडबाय’ हा सिनेमा 7 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. ‘गुडबाय’ व्यतिरिक्त अमिताभ बच्चन अयान मुखर्जीच्या बहुप्रतिक्षित ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमामध्ये झळकणार आहेत. तर, ‘द इंटर्न’ या सिनेमाच्या अधिकृत हिंदी रिमेकमध्ये देखील अमिताभ बच्चन दिसणार आहेत.

रश्मिका मंदान्ना करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

रश्मिका मंदान्नाने अनेक गाजलेल्या दाक्षिणात्य सिनेमांत काम केलं आहे. 2022 साली प्रदर्शित झालेल्या तिच्या पुष्पा या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. आता रश्मिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ‘गुडबाय’ या सिनेमाच्या माध्यमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमात ती बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 

ट्रेलर पाहा : 

संबंधित बातम्या

Goodbye Movie : मजेशीर पद्धतीनं बिग बींनी केलं ‘गुडबाय’चं प्रमोशन; रश्मिका म्हणाली, ‘पापा…’

Hindutva Motion Poster : ‘हिन्दुत्व’चे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवशी चित्रपट होणार रिलीज


Source link

Check Also

Prabhas Saif Ali Khan And Kriti Sanon Starrer Adipurush First Poster Out

Adipurush Poster Out: साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाचे पहिले अधिकृत पोस्टर …

Turkish Melek Mosso Cut Her Hair For Iran Hijab Row Support Video Viral

Iran Hijab Protest: इराणमधील (Iran) हिजाब विरोधी चळवळ दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आता …

Netizens Trolling For  marathi Actress Prajakta Mali On Post For India From London  

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती …

Leave a Reply

Your email address will not be published.