Amitabh Bachchan Buys 31st Floor Of 12000 Square Feet In Parthenon Building

Amitabh Bachchan : अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हे त्यांच्या लग्झरी लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतात. काही सेलिब्रिटींकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन असतं तर काहींचे घर हे कोट्यवधींचे असते. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. नुकतच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी देखील मुंबईमध्ये आलिशान घर घेतलं आहे. 

बिग बींचं नवं घर

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. अमिताभ हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. सध्या बिग बी हे त्यांच्या नव्या घरामुळे चर्चेत आहेत. अमिताभ बच्चन यांनी मुंबईमधील पार्थेनन बिल्डिंगमध्ये 31 व्या मजल्यावर घर घेतलं आहे. हे घर 12 हजार स्क्वेअरफूटचं आहे.  पण या घरात अमिताभ आणि त्यांचे कुटुंब राहायला जाणार नाही. कारण बिग बींनी हे घर गुंतवणूकीसाठी घेतलं आहे. 

बिग बींनी अभिनेत्री कृती सेननला भाड्यानं दिलं घर
अभिनेत्री कृती सेननला अमिताभ बच्चन यांनी त्यांचं अंधेरीमधील घर भाड्यानं दिलं आहे. 2021 मध्ये अमिताभ बच्चन  यांनी मुंबईमध्ये ओशिवारा येथे 31 कोटी रूपयांचे डुप्लेक्स घर खरेदी केले आहे. तसेच 2013 मध्ये जुहू येथे बिग बींनी त्यांच्या जलसा नावाचा बंगल्याच्या मागील बाजूला असणारी एक प्रोपर्टी घेतली. ज्याची किंमत 50 कोटी आहे, असं म्हटलं जात आहे. 

अमिताभ बच्चन यांचे आगामी चित्रपट
काही दिवसांपूर्वी अमिताभ यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.  ‘गणपत’, ‘ऊंचाई’, ‘घूमर’, Project K, ‘बटरफ्लाई’, ‘द उमेश क्रॉनिकल्स’  आणि ‘गुडबाय’ हे बिग बींचे आगमी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तसेच ते सध्या कौन बनेगा करोडपती-14 या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या कार्यक्रमधाचे ते सूत्रसंचालन करतात. बिग बींच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 


Source link

Check Also

Turkish Melek Mosso Cut Her Hair For Iran Hijab Row Support Video Viral

Iran Hijab Protest: इराणमधील (Iran) हिजाब विरोधी चळवळ दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आता …

Netizens Trolling For  marathi Actress Prajakta Mali On Post For India From London  

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती …

PHOTO: कॅमेऱ्यात कैद झाला TMC खासदार नुसरत जहाँचा ब्रालेट लूक; पाहा फोटो!

PHOTO: कॅमेऱ्यात कैद झाला TMC खासदार नुसरत जहाँचा ब्रालेट लूक; पाहा फोटो! Source link

Leave a Reply

Your email address will not be published.