Amazon India E Learning Platform Amazon Is Going To Shut Down E Learning Portal In India Marathi News

Amazon India : सोशल नेटवर्किंगमधील महत्त्वाचा प्लॅटफॉर्म अॅमेझॉन इंडियाने (Amazon India) नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉन कंपनीने भारतातील ई-लर्निंग प्लॅटफॉर्म (E-learning Platform) अॅमेझॉन अकॅडमी (Amazon Acadamy) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्लॅटफॉर्म लॉन्च झाल्यानंतर दोनच वर्षांनी भारतात बंद होत आहे. अशा वेळी या प्लॅटफॉर्मवर अनेकांनी नोंदणी केली होती. मात्र, त्यांना आता आपल्या पैशांचे काय होणार याची चिंता भेडसावत आहे. 

ई-लर्निंग प्लॅटफॉर्म कधी बंद होणार? (E-learning Platform soon to be Shut down) :

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे कोरोना महामारीच्या (Covid-19) काळात अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते. अशा विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण म्हणून अॅमेझॉन इंडियाने ई- लर्निंग प्लॅटफॉर्म भारतात सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या माध्यमातून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतात. याबरोबरच प्रवेश परीक्षांची तयारीही याद्वारे करता येणार होती. मात्र, कंपनीने घेतलेल्या या निर्णयानुसार हा प्लॅटफॉर्म ऑगस्ट 2023 मध्ये बंद होणार आहे. 

विद्यार्थ्यांनी गुंतवलेल्या पैशांचे काय होणार?

News Reels

कंपनीने सांगितले की, या प्लॅटफॉर्मवर नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी गुंतवलेले संपूर्ण शुल्क परत केले जाईल. कंपनीच्या प्रवक्त्यांनी माहिती देताना सांगितले की, हा प्लॅटफॉर्म एकदाच बंद होणार नाही तर तो टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांना त्यांचे पैसे मिळतील. असे सांगण्यात आले आहे.

या प्लॅटफॉर्मशी किती लोक जोडले गेले आहेत?

या प्लॅटफॉर्मवर सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग आहेत. तसेच 50 कर्मचारी देखील सहभागी आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या 50 कर्मचाऱ्यांना इतर व्यवसायात जोडण्यात येईल. तसे पाहता, भारतीय बाजारपेठेत अनेक मोठ्या कंपन्या या क्षेत्रात आधीच गुंतलेल्या आहेत. जसे की, Byju’s, Unacademy, Vedantu त्या मानाने अॅमेझॉनच्या या प्लॅटफॉर्मला भारतात फारसे यश मिळाले नाही. 

कंपनी बंद होण्यामागचं नेमकं कारण काय? 

कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने नेहमी पुढचा विचार केला आहे. आणि नवीन कल्पनांमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे कंपनी ज्या व्यवसायातून त्यांना फायदा होत नाही असे व्यवसाय बंद करत आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

Twitter : एलॉन मस्क यांची मोठी घोषणा, बॅन अकाऊंटवरील बंदी हटवणार, ट्विटर पोलवरून घेतला निर्णय


Source link

Check Also

Hackers Attack Icmr Website 6000 Times In Day After Aiims

ICMR Cyber Attack : एम्स (AIIMS) हॉस्पिटलच्या वेबसाईटवर सायबर हल्ला झाल्यानंतर आता भारतीय वैद्यकीय संशोधन …

Youtube Top 10 List 2022 Year Ender List Srivalli Pushpa To Kaccha Badam

Youtube Top 10 List 2022 : गुगलने (Google) 2022 या वर्षातील यूट्यूबवर (YouTube) सर्वाधिक लोकप्रिय …

Infinix Zero 5G May Launch In India Soon Know Features And Price

Infinix Zero 5G 2023 : मोबईल उत्पादक कंपनी Infinix ने आपला Zero 5G मोबाईल फोन …

Leave a Reply

Your email address will not be published.