Akshay Kumar And Bhumi Pednekar Starrer Raksha Bandhan Box Office Collection Day 4

Raksha Bandhan : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा ‘रक्षा बंधन’ (Raksha Bandhan) हा बहुचर्चित चित्रपट रक्षा बंधनच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांचे मन जिंकेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अक्षयचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाच्या कमाईत सतत घट होताना दिसत होती. मात्र, रविवारचा दिवस या चित्रपटासाठी काहीसा दिलासादायक ठरला आहे. सुट्टीच्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत काहीशी वाढ झाली आहे.

आनंद एल राय यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘रक्षा बंधन’ चित्रपटगृहांमध्ये टिकून राहणे कठीण वाटत आहे. मोठ्या आणि सलग सुट्टीच्या दरम्यान प्रदर्शित झालेल्या ‘रक्षा बंधन’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत काही खास कामगिरी केलेली नाही. मात्र, रविवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये थोडीशी वाढ झाली आहे. पुढच्या सुट्टीच्या दिवशी हा चित्रपट चांगली कमाई करू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नुकतेच या चित्रपटाचे चौथ्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे.

चौथ्या दिवशी ‘इतकी’ कमाई

रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी ‘रक्षा बंधन’च्या कमाईत काहीशी वाढ झाली आहे. बॉक्स ऑफिसच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 9 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाली होती. ‘रक्षा बंधन’ने दुसऱ्या दिवशी 6-6.40 कोटींचा व्यवसाय केला. तिसऱ्या दिवशी अक्षयच्या चित्रपटाने केवळ 6.80 कोटींची कमाई केली होती. मात्र, या चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या दिवशी एकूण 8.70 कोटींचा गल्ला जमवला आहे.

सुट्टी तरी प्रेक्षकांनी फिरवली पाठ

अक्षय कुमारचा चित्रपट रक्षाबंधनचं निमित्त साधून प्रदर्शित करण्यात आला. मात्र, याचा तरीही या चित्रपटाच्या कलेक्शनवर याचा काहीच परिणाम झालेला नाही. सुट्टीच्या दिवसांत देखील प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. अर्थात या चित्रपटाला सुट्ट्यांचा देखील काहीच फायदा मिळालेला नाही. आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट देखील रक्षाबंधनाच्या दिवशी प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांची टक्कर झाली. मात्र, या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये कोणतेही महत्त्वाचे बदल दिसत नाहीत. दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरत आहेत.

बहिण-भावाची कथा

अक्षयसोबतच अभिनेत्री भूमि पेडणेकर, सादिया खतीब, स्मृती श्रीकांत, दीपिका खन्ना आणि सहजमीन कौर हे कलाकार ‘रक्षा बंधन’ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल रॉय यांनी केलं आहे. अक्षयच्या या चित्रपटात भरपूर फॅमिली ड्रामा आहे. बहिण-भावाच्या नात्यातील गोडवा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय आणि भूमीची जोडी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. याआधी दोघे ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटात एकत्र दिसले होते.

संबंधित बातम्या

Raksha Bandhan Trailer : खिलाडी कुमारच्या ‘रक्षा बंधन’चा ट्रेलर आऊट; अक्षय आणि भूमीच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

Raksha Bandhan : कोणाला व्हायचं होतं इंजिनियर तर कोण आहे मॉडेल; पाहा कोण आहेत ‘रक्षा बंधन’मधील अक्षयच्या चार बहिणी


Source link

Check Also

Gandhi Jayanti 2022 The Only Hindi Film Mohandas Karamchand Gandhi AKA Mahatma Gandhi Watched Was Ram Rajya

Gandhi Jayanti 2022 : आज 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती …

Gandhi Jayanti Mahatma Gandhi Birth Anniversary Bollywood Actors Who Played The Gandhi In Films

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती. त्यानिमित्ताने देशभर गांधीजींचं स्मरण केलं जातंय. …

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी'

PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह… या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी' Source link

Leave a Reply

Your email address will not be published.