After Raju Srivastava Death Cricket World Is Also Shocked Cricketers Including Sehwag Dhawan Pay Tribute

Raju Srivastava Death : कॉमेडी किंग म्हणून प्रसिद्ध राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांचे वयाच्या 59 व्या वर्षी दिल्लीच्या AIMS रुग्णालयात निधन झाले. 10 ऑगस्ट रोजी छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, ”यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टीही करण्यात आली. त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. राजूने 42 दिवस झुंज दिली पण अखेर आज (21 सप्टेंबर) त्यांचं निधन झालं असून या निधनानंतर सर्वच स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. क्रिकेट जगतातीलही अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर युवराज सिंह, कृणाल पांड्या, वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना यांच्यासह अनेकां सेलिब्रिटीं त्यांना श्रद्धांजली वाहिली. ट्वीटरवर फोटो शेअर करत युवराजने लिहिले की, “ज्याने आपल्याला खूप हसवले, त्याला या जगाचा निरोप घ्यावा लागला हे दुःखद आहे. राजू श्रीवास्तवजी तुम्ही लवकर निघून गेलात.” 

राजू श्रीवास्तव यांचा खडतर प्रवास

25 डिसेंबर 1963 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे राजू श्रीवास्तव यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव हे प्रसिद्ध कवी होते. लहानपणापासूनच राजू श्रीवास्तव यांना मिमिक्रीची आवड होती. शाळेतील शिक्षकांची तसेच विविध सेलिब्रिटींची मिमिक्री राजू हे करत होते. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी 1988 मध्ये राजू हे मुंबईमध्ये शिफ्ट झाले. पण मुंबईमध्ये त्यांना स्ट्रगल करावा लागला. एका मुलाखतीमध्ये राजू यांनी सांगितलं होतं की, मुंबईमध्ये ते रिक्षा चालवत होते. रिक्षा चालक असताना रिक्षात बसलेल्या प्रवाशांचे ते मिमिक्री करुन मनोरंजन करत होते. तसेच बर्थ-डे पार्टीमध्ये देखील ते स्टँडअप कॉमेडी करत होते. या स्टँडअप कॉमेडिच्या शोसाठी ते 50 रुपये मानधन घेत होते. त्यानंतर काही वर्षांनी विविध स्टेज शोमधून राजू हे प्रेक्षकांच्या भेटीस आले.  1993 मध्ये राजू आणि शिखा यांचे लग्न झाले. त्यांना मुलगी अंतरा आणि मुलगा आयुष्मान ही दोन मुलं आहेत. राजू श्रीवास्तव यांनी अनेक चित्रपट आणि कार्यक्रमांमध्ये देखील काम केलं असून त्यांच्या ‘गजोधर भैय्या’ या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. 

हे देखील वाचा : 

Raju Srivastav Death :  कॉमेडी किंगनं घेतला जगाचा निरोप; राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Source link

Check Also

IND Vs SA 3rd T20 Match Highlights South Africa Won By 49 Runs Against India Holkar Stadium Dinesh Karthik 46 Runs Off 21

IND vs SA 3rd T20 Match Highlights: रिले रोसो (Rilee Rossouw)- क्विंटन डी कॉकच्या (Quinton …

3rd T20I: SA win inconsequential match; India unflustered in loss

The third umpire wanted confirmation when Tristan Stubbs’s low grab off Suryakumar Yadav – plucked …

IND Vs SA 3rd T20 Match Highlights South Africa Won By 49 Runs Against India Holkar Stadium Dinesh Karthik 46 Runs Off 21

IND vs SA 3rd T20:  रिले रोसो (Rilee Rossouw)- क्विंटन डी कॉकच्या (Quinton de Kock) …

Leave a Reply

Your email address will not be published.