After Apple Iphone 14 Launch Iphone 13 Price Less Announced In India Marathi Tech News

iPhone 13 Price In India : Apple ने बुधवारी त्यांच्या फार आउट इव्हेंटमध्ये नवा iPhone 14 सीरीजची घोषणा केली. जागतिक आर्थिक मंदी लक्षात घेता नवीन आयफोन मॉडेल त्यांच्या मागील सीरीजपेक्षा जास्त महाग नाहीत, ही बाब ग्राहकांसाठी दिलासादायक आहे. मात्र याबाबत आणखी एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे जे लोक  iPhone 13 खरेदी करण्याची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांच्यासाठी Apple ने किमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ग्राहक आता या फोनच्या किंमतीबाबत जाणून घेण्यात व्यस्त दिसत आहेत. भारतातील एक वर्षापूर्वी iPhone 13 ची किंमत पाहिली तर याच्या लॉन्चिंगच्या किंमतीपेक्षा 10,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. जाणून घ्या सविस्तर.

iPhone 13 10 हजार रुपयांनी स्वस्त 

Apple भारतातील त्यांच्या ऑनलाइन स्टोअरवर यापूर्वी 79,900 रुपयांच्या लॉन्च किमतीवर iPhone 13 विकत होते. iPhone 13 ची किंमत 69,900 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. सणासुदीच्या विक्रीदरम्यान Amazon आणि Flipkart वर  iPhone 13 वरील सूट देण्यात आली आहे, ज्यामुळे ग्राहकांना लाँचच्या किंमतीपेक्षा 15,000 रुपयांनी कमी किंमतीत डिव्हाइस मिळू शकतो. Apple Store ला प्राधान्य दिल्यास आता तुम्हाला iPhone 13 साठी 10,000 रुपये कमी द्यावे लागतील. Phone 13 चांगल्या डील्स बाजारात उपलब्ध आहेत, जे तुम्ही लगेच मिळवू शकता. 

iPhone 13, iPhone 13 mini भारतातील किंमत 

iPhone 13 फोनची किंमत आता 69,900 रुपयांपासून सुरू होते, तर iPhone 13 Mini आता 64,900 रुपयांपासून सुरू होते. पाहा किंमतींची संपूर्ण यादी

iPhone 13 मिनी 128GB – रु. 64,900
iPhone 13 मिनी 256GB – रु 74,900
iPhone 13 mini 512GB – रु 94,900
iPhone 13 128GB – रु. 69,900
iPhone 13 256GB – रु 79,900
iPhone 13 512GB – रु 99,900

iPhone 12 च्या किंमतीतही कपात
Apple ने भारतात iPhone 12 च्या किमतीतही कपात केली आहे. आयफोन 12 आता 59,900 रुपयांपासून सुरू होतो, तर आयफोन 12 मिनी बंद करण्यात आला आहे. iPhone 12 Mini ची पूर्वीची किंमत 64,900 रुपये होती तर iPhone 12 ची किंमत 69,900 रुपये होती. आयफोन 12 दोन वर्षांपूर्वी आयफोन 14 सारख्याच किमतीत लॉन्च करण्यात आला होता.

संबंधित बातम्या

Apple iPhone 14 Launch: iPhone 14 अखेर लॉन्च; जगातील सर्वात फास्ट फोन, कंपनीचा दावा

iPhone without charger : चार्जरशिवाय आयफोन विकण्यावर ॲपलला ‘या’ देशात बंदी, 20 कोटींचा दंड


Source link

Check Also

Big Shock To Those Who Use Google Translate, Google Has Stopped The Service

Google Translation: जगभरात मोठ्या प्रमाणात भाषांतर करण्यासाठी गुगल ट्रान्सलेटचा वापर केला जातो. दुसऱ्या एखाद्या भाषेतील …

Reliance Jio To Launch 4G Enabled Laptop JioBook At Rs 15000

Reliance Jio Laptop :  उद्योगपती मुकेश अंबानी यांचे रिलायन्स जिओ  (Reliance Jio )  लवकरच 4G …

Twitter War On Arrow : आशिष शेलार आणि सुशमा अंधारे यांच्यात ट्विटर वॉर

<p>अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरुन भाजपचे आशिष शेलार आणि शिवसेनेच्या सुष्मा अंधारेंमध्ये ट्विटरवॉर रंगलंय..&nbsp;</p> Source link

Leave a Reply

Your email address will not be published.